( पोस्ट नं 5 )
+++++++++++++++++
बुध्द आणि त्यांचा धम्म
+++++++++++++++++
प्रथम खंडः भाग पहिला
21) बुंध्यापासुन फांद्यांच्या शेंड्यापर्यत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगाचे असंख्य भ्रमर चिञविचिञ आवाजात गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षिगण मंजुळ स्वरालाप काढीत होते.
22) तेथील मनोरम दृश्य पाहुन महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली .म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले
23) महामाया पालखीतुन उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वारयाच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहुन महामायेला त्यांपैकी एक फांदी हातात धरावी असे वाटले.
24) सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली.इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हातात धरली .तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली . आणि अशा प्रकारे हालल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या .शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने मुलाला जन्म दिला .
25) त्या मुलाचा जन्म खिस्तपुर्व 563 व्या वर्षी वैशाखी पोर्णिमेला झाला.
26) शुध्दोदन व माहामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती .परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते . आणि म्हणून पुञप्राप्ती झाली तेव्हा शुध्दोदनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुञजन्मचा तो उत्सव मोठ्या हर्षील्हासाने थाटामाटात साजरा केला.
27) पुञजन्माच्या या वेळी कपिलवस्तुचे राजपद भूषविण्याची पाळी शुध्दोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधन्यात येऊ लागले .
क्रमशः ............
रोज वाचा बुध्द आणि त्यांचा धम्म
प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे.
विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा