धम्मपथ

शनिवार, ७ एप्रिल, २०१८

भिमजयंती

असे करता येऊ शकेल का?

सध्या मनुवादी विरुद्ध आंबेडकरवादी हा संघर्ष गल्ली पासुन दिल्ली पर्यंत जोर पकडत आहे, मनुवाद्यांकडे पैशांची काहीच कमतरता नाही, मीडीयाची कमी नाही, आयटी सेलही मजबुत आहेत, आपन मात्र या तिनही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा खुपच कमकुवत आहोत. हे सर्वांन  मान्य असावे.
मग आपन २०१९ च्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या दिसत असताना मनुवाद्यांशी राजकीय दोन हात करण्यासीठी वरील तिनही क्षेत्रात मागे पडु शकतो.
माझी अशी संकल्पना आहे की यावर्षी ची भिमजयंती ची वर्गणी *ऑर्केष्ट्रा, गायन पार्टी, नाचगाणे, मिरवणुक, डिजे, फटाके, मंडप, हाथी घोडे, डेकोरेशन, जेवन* या सर्व गोष्टीसाठी खर्च न करता तो पुर्ण पैसा संघटना मजबुत करण्यासाठी किंवा निवडणुकांसाठी, त्यावेळच्या प्रचार यंत्रणा, त्यावेळचे प्रबोधन, कैम्पेनिंग यासाठी राखुन ठेवला तर
कारण बाबासाहेबांच्या विचारांचे, संविधानाचे किंवा लोकशाहीचे संरक्षण सध्या आपल्या हौस व मौजमजेपेक्षा जास्त महत्वाचे आहे.
*आपन नाचलो नाही म्हणुन आपली अस्मिता कमी होणार नाहि मात्र आपन निवडणुकात मनुवाद्यांसमोर यावेळी जर हार खाल्ली तर मात्र अस्मिता, शान, शौक, स्वाभिमान, अधिकार या सर्वांचा राखरांगोळी निश्चित होणार*

एक दिवस नाचणार बाकी दिवस वाचणार बोलणारे " काही लोक आहेत त्यांनी सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन करावे व ठरवावे, बाबासाहेबांच्या विचारांची पेरनी करण्यासाठी तो पैसा वापरला तर बाबासाहेबांच्या आंदोलनात आपन योग्य मार्गावर जाऊ शकतो, कोणतीच क्रांती नाचुन झालेली नाही सर्वच्या सर्व क्रांत्या वाचुनच झालेल्या आहेत.

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांच्या हयातीत स्वतःच्या जन्मदिवस साजरा करायला नेहमी विरोधच केला होता.
बाबासाहेबांनीही त्यांचे गुरु तथागत बुद्धांची जयंती साजरी केली त्याचे स्वरुप कसे होते व आपन करतो त्या जयंतीचे स्वरुप कसे असते?
“मेरा जीवन ही मेरा संदेश है“ असे बाबासाहेब बोलतात, मग आपन त्यांच्या संदेशा नुसार वागलो पाहीजे, बाबासाहेबांनी जनतेच्या पैशाने कधी फेस्टिवल केले नाहीत तर त्या पैशाने संघटना मजबुत केल्या व शैक्षणिक संस्था ऊभ्या केल्या, स्वतःचा मीडीया / पाक्षिक उभे केले. आपनही त्याच मार्गाने गेले पाहीजे व बलाढ्य मनुवादी विरोधकांसमोर फक्त पैसा व यंत्रणे अभावी आपन राजनैतिक लढाई हरणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.
कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही, फक्त आपन वाट चुकलोय याची जाणीव झाली आहे ती मी जाहिर रित्या व्यक्त केली आहे.

- मनोज काळे, ठाणे
  ६ एप्रिल २०१८.

रविवार, १७ एप्रिल, २०१६

बुद्ध आणि त्यांचा धम्म ७

( पोस्ट नं 7 )
=================
बुध्द आणि त्यांचा धम्म
=================
प्रथम खंडः भाग पहिला 

11) असित ऋषी,शुध्दोदन म्हणाले मुनिवर बालक आता झोपला आहे . थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला " राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत आसतात ."

12) इतक्या त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली .

13) बालक जागे झालेले पाहताच शुध्दोदनाने आपल्या दोन्ही हातानी त्याला उचलुन घेऊन ऋषीच्या समोर आणले .

14) असित ऋषीने त्या बालकाला निरखुन पाहीले तेव्हा ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त दिसले . त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्या यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्ञ पटीने अधिक दैदिप्यमान आहे. असितऋषीच्या मुखातुन त्वरीत उदगार निघाले . " निस्संदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असितमुनी आपल्या आसनावरुन उठले व आपले दोन्ही हात जोडुन त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला . त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानामग्न  स्थितीत ते उभे राहीले .

15) असितऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्याच्या पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहीला तर चक्रवर्ती सम्राट होईल. पण जर गृहत्याग करुन त्यांने संन्यास घेतला तर तो सम्यक सबुध्द असा बुध्द होईल .

16) असित ऋषीला खाञी होती कि हे  बालक गृहस्थी जीवनात राहणारा नाही .

17) त्या बालकाकडे पाहुन अश्रु ढाळीत दीर्घ निःश्वास टाकीत तो ऋषी रडू लागला .

18) असितमुनी अश्रु ढाळीत व दीर्घ निःश्वास टाकीत रडत आहे हे शुध्दोदनाने पाहीले

19) असितमुनी रडत असलेला पाहुन शुध्दोदनाच्या अंगावर रोमांच उभे राहीले आणि त्यांनी व्याकुळतेने असितमुनीला विचारले " हे मुनीवर आशा रितीने का रडत आहात ? अश्रु का ढाळीत आहात ? दीर्घ निःश्वास का टाकीत आहात ? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना. ?

20) हे एकून ऋषी म्हणाला " राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे माझ्यासाठी .......

क्रमशः.....

प्रत्येक रविवारी सकाळी बुध्द विहारात गेलेच पाहिजे

        विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर

स्तुपांची मंदिरे - आयप्पा मंदिर

स्तुपांची मंदिरं- (आयाप्पा मंदिर)

श्री. के. आर. वैद्यनाथन यांचे म्हणने आहे कि केरळातील आयप्पा मंदिर सुद्धा एक बौद्ध मंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथील मुख्य पुजा “चक्कीयार कुट्टु” हा विधी सुद्धा बौद्ध भिक्षुंच्या ध्र्मोपदेशाचे रुपांतर आहे. (संदर्भ: के. आर. वैद्यनाथन : १९८२: ४ )

प्राथमिक हिंदु वांगमयात आयाप्पाचे उल्लेख नाही
प्राचिन साहित्यात या देवतेच्या उल्लेखाबद्द्ल श्री. टी. ए. गोपिनाथ राव यांचे म्हणने आहे कि ( टी. ए. गोपिनाथराव: १९८५: खंड २ : ४८६) ही देवता जी द्रविड देशाची विशेषता आहे, गोदावरिच्या उत्तरेत अनोळखी आहे. कोणत्याही प्राचिन संस्कृत ग्रंथात या देवतेचा उल्लेख नाही तसेच या देवतेच्या उगमाबद्दल काहि धर्शविले नाही.
विष्णु पुराणात केवळ मोहिनी बद्दल माहिती आहे पण केवळ भागवतामधे आपल्याला प्रथमत: कळते कि, शिवाचे मोहिनी रुपातील विष्णुशी प्रेम झाले आणि हरि तथा हर यांच्य समागमातुन निर्माण झाला आर्य, शास्ता अथवा हरीहर पुत्र.
“सुप्रभेदागम” या ग्रंथात स्पष्ट रुपाने म्ह्टले आहे कि, क्षिरसागराचे मंथन केल्यानंतर अमृताची वाट्णी देवांमधे करण्याच्या हेतुने विष्णूने मोहिनी रुप धारण केल. मोहिनीशी हर याच्या समागमातुन शास्ता याचा जन्म झाला.
हे लक्षणीय आहे कि, भागवत पुराणाचा रचनाकाळ विद्वानांच्या मते इ.स. चे दहावे शतक मानल्या जातो.
आयाप्पाचा काळ

आयाप्पा यांच काळ मलियालम शके ३००-४०० म्हणजेच इ.स. चे ११२५ ते १२२५ यामधे कुठेतरी असल्याचा विद्वानांचा कयास आहे. १८२० इसवी पासुन त्रावणकोर येथील शासकांनी पंडालम ज्यामध्ये सब्रिमलाचा सामावेश होता या भागाला आपल्या राज्याला जोडुन घेतले तेंव्हापासुन राज्यातील सर्व मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर च्या प्रशासनामार्फत चालविण्यात येते. भारताला स्वातंत्र मिळाल्या नंतर हे प्रशासन त्रावणकोर देवस्वम बोर्ड यांच्याकडे आले.
शास्ता या नांवाच्या उगमाबद्दल श्री. राव यांचे म्हणणे आहे कि, या देवतेला शास्ता यासाठी म्हणतात कि, संपुर्ण जगावर याचे नियंत्रण तथा शासन राहत असे. शब्द व्युत्पत्ती शास्त्रीय दृष्टीने या शब्दाचा अर्थ देशाचा शासक असा होतो. कधीकधी हा शब्द गुर किंवा पित्यासाठी वापरल्या जातो. अमरकोषात हा शब्द बुद्धासाठी प्रयुक्त झालेला आहे. तामिल निघंटु मधे त्याचे कित्येक ईतर नावे दिली आहेत. ती नावे अशी आहेत, सातवाहन, श्वेतहत्तीचा स्वार, करी, सेन्डू नामक शस्त्र धारण कर्ता, पुर्णा तथा पुष्कला यांचे पती, धर्माचे ऱक्षक तथा योगी. आणि पुढे ते म्हणतात कि, शास्ताचे वाहन हत्ती आहे आणी त्यांचे निशाण ध्वजावर कोंबडा आहे. “श्वेत हत्तीचे स्वार, योगी, धर्मरक्षक हि स्र्व नांवे तसेच अमरकोषात शास्ता हे बुद्धाचे नांव असणे या सर्वावरुन असा निष्कर्ष निघतो कि, तामिळ देशात मानल्या जाणारा आणि पुजला जाणारा बुद्ध ह्याला शेवटी हिंदु देवता संघात सामील केल्या गेले. आणि त्याच्या उगमासाठी एक कथा पुराणात नंतरच्या काळात रचल्या गेली. असे भारतीय मुर्तीविकास शास्त्राच्या ईतिहासात दिसते.” (संदर्भ: टी. ए. गोपिनाथराव : १९८५ खंड २: ४८७)
आयाप्पा बोधिसत्वाचे शस्त्र धारण करतो:

अंशुमभेदागम, सुप्रभेदागम तसेच करतांगम इत्यादी शास्त्रात वर्णन केलेल्या प्रमाणे मुर्तीचे वर्णन श्री. राव हे देतात. या वर्णनात लक्षणीय़ बाब अशी आहे कि, “ भगवान पिठावर बसले आहेत, डाव पाय खाली मुडपलेला आहे, उजवा पाय पिठावर मोडुन स्थीर केला आहे. गुडघ्यावर हाताचे कोपर टेकले आहे, आणि उजव्या हातात वज्रदंड घेतला आहे. ( लक्षणिय बाब हि कि वज्र हे बौद्ध बोधिसत्वाचे खास आयुध होय).
केरळमधे संगम काळातील बौद्ध:

अमेरिकेतील नार्दन मिशीगन युनिव्हर्सिटीतील डॉ. झकारियास थुंडी यांनी “ दि केरला स्टोरी” मध्ये केरळातील बुद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे. तामीळ संगम ग्रंथावरुन दिसते कि, तामीळनाडुत त्या काळी बौद्ध लोक होते. आणि बौद्ध भिक्षु तामिळनाडुत आणि केरळमध्ये धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम अतिशय जोमाने करत होते. हे सर्व तामीळ बौद्ध ग्रंथ मनीमेखलाई या संगम युगातील बौद्ध ग्रंथावरुन दिसुन येते. संगम परंपरे प्रमाणे वांची (करुर) येथे एक प्रख्यात बौद्ध चाटी म्हणजे बौद्ध मंदिर होते. आनी त्या काळातील पल्ली बान पेरुमल ह्या राजाने बौद्ध धर्म सिवकारला होता.

चेरा लोक मुलत: मुंडा होते. त्यांच्या पैकी अनेक तामीळनाडुन्त येण्यापुर्विच बुअद्ध होते. हि सर्व मंडळी आनी तसेच मौर्य साम्राज्यातुन आलेले बौद्ध या सर्वानी मिळून बुद्ध धर्माला द्क्षीण भारतात आणले.

“आलविकापथिकम” यात म्ह्टले आहे कि, ६४० इसवी च्या सुमारास एक ब्राह्मण संबंधमुर्ती याने पांड्या राजघराण्यातील मंडळीना आपलेसे करुन मदुराई येथे आठ हजार बौद्ध भिक्षुंची कत्तल घडविली.

या लेखात असे म्हटले आहे कि, हिंदु मंदिर परिसरातील बौद्ध भिक्षुणींचे पतन करुन त्याना देवदासी बनविन्यात आले. अशाप्रकारे राजाच्या छळाला कंटाळुन सर्वच्या सर्व बौद्ध मंडळी केरळात रवाना झाली.

केरळात आलेल्या बौध्द लोकानी वेगवेगळ्या ठिकाणी मठ, मंदिरे आणि विहारांची स्थापना केली. आजची अनेक हिंदु मंदिरे एकेकाळी बौद्ध क्षेत्रे होती. ती येणेप्रमाणे: त्रिचुर येथील वडक्कुनाथ मंदिर, क्रंगनोर येथील कुरूंबा भगवती मंदिर आणि त्रिचुर नजिक पारुवासेरी दुर्गा मंदिर इ..

अलेप्पी आणि क्वीलॉन या तटवर्ती जिल्ह्यात बुद्धाच्या अनेक मुर्त्या फार मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे अम्बालपुज्झा जवळील करुमती कुट्टन येथील प्रसिद्ध बुद्धमुर्ती फारच महत्वाची आहे.

६५० ते ८५० इसवी या दोनशे वर्षात केरळात बुद्ध धर्म अतिशय जोमात होता. “अय राजा वरगुना (८८५-९२५) यांच्या पालियम या ताम्रपत्रा वरुन असे दिसते कि, बौद्धाना दहाव्या शतकात सुद्धा काहि प्रमाणात राजाश्रय प्राप्त झाला होता.

महान केरलियन कवी कुमारन आसन यांच्यावर सुद्धा बुंद्ध धर्माचा फार प्रभाव होता. त्यानी “करुना” “चांडाल भिक्षुणी” व “श्री बुधचरीतम” इत्यादी बौद्ध काव्याचि रचना केली.

ऐतिहासिक आयाप्पा कोण ?

डॉ. झाकरियास थुंडी म्हणतात कि, “आयाप्पा बुद्ध आहे, कारण बुद्धाला शास्ता असे म्हणतात. आणी शरणम म्हनून म्हटल्य जाणारी प्राथना बुद्धासाठीच असते व आयाप्पाच्या काही मुर्त्या बुद्धमुर्तीशी फारच जवळचे साम्य दर्शवितात.”

वेडानचा चेरा राजा अय्यन अडिगल तिरुवटीगल यांच्या शासन काळात पुर्वेकडुन चोल राजे आणी पांड्य राजे यांचे केरळवर आक्रमण झाले. “केरलोत्पत्ती” (अध्याय ५) या ग्रथात देरामन पेरुमल (राजशेखर) ह्या केरळातील राजाच्या शासन काळात पांड्य राजाच्या आक्रमणाचा उल्लेख आहे. तसेच सैन्याचे सेनापती उदयवर्मण याचाही उल्लेख आहे. आयाप्पा दंतकथेत अयप्पनच्या एका उदयनन यांच्यावरिल लष्करी विजयाचा उल्लेख आहे.

“केरलोत्पत्ती” या ग्रंथात केरळातील बुध्दधर्माच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची माहिती दिलेली आहे. आयाप्पा संप्रदयत ती प्रतिबिंबीत झाली आहे. तसेच मुस्लिम परंपरेप्रमाणे शेवटचा पेरुमल याने मुस्लिम धर्म स्विकारला, आपले नाव अब्दुल रहमान समिरी असे बदलले, एक मुस्लीम स्त्री रहाबीयेत हिच्याशी लग्न करुन अरेबियाच्या किना-यावरिल शाहार येथे तो रहायला गेला असे समजते. म्हणुन वेनाडचा राजा अय्यन याचा काळ हा सिनिकी स्वा-या व बौद्ध आणी मुस्लिम प्रभावाचा काळ होता. आणि एक राजा राजशेखर हा त्यांचा सम्राट होता असे दिसते.

वरिल ऐतिहासिक पार्श्वभुमीवर जेंव्हा आपण आयाप्पाच्या परंपरेचा विचार करतो तेंव्हा डॉ. झकारीयास थूंडी यांच्या मताप्रमाणे भगवान आयाप्पा म्हणजे “Apotheosis of Ayyan Adigal” होय.

त्यांच्या मता प्रमाणे भगवान आयाप्पा हे मानवी वेनाडचा वीर राजा अय्यन अडिगल यांचे दैविकर्ण होय.

आयाप्पा देवतेला शरणं म्हणुन शरण जाण्याची प्रथा, अठरा पाय-याचे रहस्य व इतर विधी व त्या काळातील केरळमधिल बौद्ध धर्माचा ईतिहास बघता हे एक बुद्ध मंदिर असल्याचेच वाटते.

लेखक:  रामटेके सर
विचार प्रसारक
मनोज काळे, बदलापुर

शनिवार, १६ एप्रिल, २०१६

बुद्ध आणि त्यांचा धम्म ६

( पोस्ट नं 6 )
=================
बुध्द आणि त्यांचा धम्म
=================
प्रथम खंडः  भाग पहिला

4) असितमुनीचे आगमन

1) ज्या वेळी त्या बालकाचा जन्म झाला त्या वेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता.

2) असित ऋषीने पाहीले की. अंतररिक्षातील देव बुध्द या शब्दांचा ध्वनी करीत आहेत व त्यांचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे .त्यांने पाहीले की ते आपली वस्ञभूषने मिरवित इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत .त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुध्दाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये .

3) त्याने आपल्या दिव्यदृष्टीने सर्व जंबुव्दिपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुध्दोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असुन त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले.

4) म्हणून तो महान ऋषी  उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुध्दोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशदारी उभा राहिला .

5) तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहीले तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि म्हणाला आरे राजाला जाऊन सांगा की दाराशी एक तपस्वी उभा  आहे

6) तेव्हा तो द्वारपाल शुध्दोदनाजवळ गेला आणि हात जोडुन म्हणाला " महाराजा दाराशी एक वयोवृध्द ऋषी येऊन उभे राहिले आहेत ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहे

7) राजाने असितमुनीकरता एका आसनाची व्यवस्था केली आणी तो व्दारपालास म्हणाला त्या ऋषींना आत येऊ दे तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असितमुनीला म्हणाला कृपा करुन आत चला

8) असितमुनी शुध्दोदन राजाजवळ गेला व त्याच्यापुढे उभा राहुन म्हणाला विजय असो राजा तुझा विजय असो तु आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधर्माने चालव .

9) तेव्हा शुध्दोदनाने असितमुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले . असितमुनी सुखपुर्वक स्थानापन्न झाल्यावर शुध्दोदन म्हणाला " हे तपस्वी यापुर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा काय हेतु काय असेल बरे  आपण इथे येण्याचे काय कारण

10) असित ऋषी शुध्दोदनाला म्हणाला "  राजा तुला पुञप्राप्ती झाली आहे तुझ्या पुञाला पाहण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे.

क्रमशः वाचा ........
     बुध्द आणि त्यांचा धम्म

प्रत्येक रविवारी सकाळी बुध्द विहारात गेलेच पाहिजे

           विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर

शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

बुद्ध आणि त्यांचा धम्म ५

( पोस्ट नं 5 )
+++++++++++++++++
बुध्द आणि त्यांचा धम्म
+++++++++++++++++

प्रथम खंडः  भाग पहिला

21) बुंध्यापासुन फांद्यांच्या शेंड्यापर्यत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगाचे असंख्य भ्रमर चिञविचिञ आवाजात गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षिगण मंजुळ स्वरालाप काढीत होते.

22) तेथील मनोरम दृश्य पाहुन महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली .म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले

23) महामाया पालखीतुन उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वारयाच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहुन महामायेला त्यांपैकी एक फांदी हातात धरावी असे वाटले.

24) सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली.इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हातात धरली .तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली . आणि अशा प्रकारे हालल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या .शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने मुलाला जन्म दिला .

25) त्या मुलाचा जन्म खिस्तपुर्व 563 व्या वर्षी वैशाखी पोर्णिमेला झाला.

26) शुध्दोदन व माहामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती .परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते . आणि म्हणून पुञप्राप्ती झाली तेव्हा शुध्दोदनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुञजन्मचा तो उत्सव मोठ्या हर्षील्हासाने थाटामाटात साजरा केला.

27) पुञजन्माच्या या वेळी कपिलवस्तुचे राजपद भूषविण्याची पाळी शुध्दोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधन्यात येऊ लागले .

क्रमशः ............
रोज वाचा बुध्द आणि त्यांचा धम्म

प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे.

        विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर

बुद्ध आणि त्यांचा धम्म ४

( पोस्ट नः 4  )
*****************
बुध्द आणि त्यांचा धम्म
****************
प्रथम खंड भाग पहिला

11) दुसरया दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुध्दोदनास सांगितले .स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुध्दोदनाने स्वप्नविद्येत पारगंत असलेल्या आठ ब्राम्हणाला बोलावून घेतले.

12) त्यांची नावे राम, धन , लख्खन , मन्ती, यण्ण, सुयाम, भोग, व सुदत्त  अशी होती .शुध्दोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली .

13) त्यांने सेवकांकडुन जमिनीवर फुलांचे सडे घालुन त्या ब्राम्हणासाठी उच्चासने मांडली .

14) त्याने त्या ब्राह्यणांची पाञे सोन्याचांदीचे भरुन घृतमधुयुक्त व साखरमिश्रीत दुध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले .याशिवाय त्यांना नवी वस्ञे , गायी इत्यांदीचे दान दिले .

15) ब्राम्हण संतुष्ट झाल्यावर शुध्दोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला " या स्वप्नाचा अर्थ मला सांगा"

16) राजा चिन्ता करु नकोस ब्राम्हण म्हणाले तुला एक असा पुञ होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसारत्याग करुन जर तो संन्याशी झाला तर विश्वातील अंधःकार नाहीसा करणारा भगवान बुध्द होईल.

17) पाञातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महीने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले . तिचा प्रसुतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली . आपल्या पतीला ती म्हणाली " माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छीते "

18) तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुध्दोदनाने मोठ्या लवाजम्यासहीत तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले .

19) देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हादायक गर्द वनराईतुन महामायेला जावे लागणार होते .तेच लुंबिनी वन होय

20) लुंबिनी वनातुन पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चिञातला वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्याअत्याचाराला मंडपासारखे भासत होते .

क्रमशः वाचा
बुध्द आणि त्यांचा धम्म 

प्रत्येक रविवारी सकाळी बुध्द विहारात गेलेच पाहिजे

           विश्वरत्न
डाँ बाबासाहेब आंबेडकर

......