धम्मपथ

गुरुवार, ३१ मार्च, २०१६

संत कबीर अमृतवाणी

☸ संत कबीर अमृतवाणी☸

पर नारी पैनी छुरी,
विरला बांचै कोय
कबहुं छेड़ि न देखिये,
हंसि हंसि खावे रोय।

अर्थ

महान संत कबीर जी कहते हैं कि दूसरे की स्त्री को अपने लिये पैनी छुरी ही समझो। उससे तो कोई विरला ही बच पाता है। कभी पराई स्त्री से छेड़छाड़ मत करो। वह हंसते हंसते खाते हुए रोने लगती है।

विचार प्रसारक
मनोज काळे,बदलापुर
☸☸☸☸☸☸☸

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

जातक कथा १

☸जातक कथा १☸

१. हातचें सोडून पळत्याच्या पाठीमागें लागू नये

( अपण्णक जातक नं.१)

हीच कथा थोड्या भिन्न प्रकारानें दीघनिकायांतील पायासिसुत्तांत सांपडते.

प्राचीन काळीं वाराणसीनगरांत ब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत होता. त्या वेळीं आमचा बोधिसत्त्व एका मोठ्या सावकाराच्या कुळांत जन्माला येऊन वयांत आल्यावर पांचशें गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्वदिवशेला जाई, आणि कधी कधीं पश्चिम दिशेला जाई.

एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्त्वानें परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली. त्याच वेळीं दुसरा एक व्यापारी आपल्या पांचशे गाड्या घेऊन त्याच रस्त्यानें जाण्यास तयार झाला होता. त्याला बोधिसत्त्व म्हणाला, ''मित्रा, आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गानें गेलों, तर आमच्या बैलांना वैरण मिळण्यास अडचण पडेल. आमच्या माणसांनाहि शाकभाजी बरोबर मिळणार नाहीं तेव्हां आमच्यापैकीं एकानें पुढें जावें, व दुसर्‍यानें आठ पंधरा दिवसांनी मागाहून जावें हें बर.''

तो दुसरा व्यापारी म्हणाला, ''मित्रा, असें जर आहे, तर मीच पुढें जातों. कां कीं माझी सर्व सिद्धता झाली आहे. आतां येथें वाट पहात बसणें मला योग्य वाटत नाहीं.''

बोधिसत्त्वाला ही गोष्ट पसंत पडली. त्या व्यापार्‍यानें पुढें जावें व बोधिसत्त्वानें पंधरा दिवसांनी त्याच्या मागाहून जावें असा बेत ठरला. तेव्हां तो व्यापारी आपल्या नोकरांस म्हणाला, ''गडे हो, आजच्या आज आम्हीं प्रवासाला निघूं. पुढें जाण्यामुळें आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे. आमच्या बैलांना चारापाणी यथेच्छ मिळेल, व आमच्या मालाला दामदुप्पट किंमत येईल.''

पण बोधिसत्त्वाच्या अनुयायांना हा बेत आवडला नाहीं. ते आपल्या मालकाला म्हणाले, ''तुम्ही हें भलतेंच काय केलें ! आमची सर्व तयारी आगाऊ झाली असतां तुम्ही त्या गृहस्थाला पुढें जाण्यास अनुमति दिली हें काय ? आम्हीं जर त्याला न कळवितां मुकाट्यानें पुढें गेलों असतों तर आमच्या मालाचा चांगला खप होऊन आपल्या पदरांत पुष्कळ नफा पडला असता.'

☸☸☸☸☸☸☸

सोमवार, २१ मार्च, २०१६

शेतकर्याचा आसुड

शेतकर्यांचा आसुड -
            क्रांतीबा फुले,

क्रमशः पुस्तक - उपोद्घात

विद्येविना मति गेली,
मतीविना नीति गेली,
नीतिविना गति गेली !
गतिविना वित्त गेले,
वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले.

उद्देश,
शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे विवेचन करण्याच्या हेतूनें हा पुढील ग्रंथ रचिला आहे. शूद्रशेतकरी बनावट व जुलमी धर्माचे योगाने एकंदर सर्व सरकारी खात्यांनी ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असल्याने भटभिक्षुकांकडून व सरकारी युरोपियन कामगार ऐषआरामी असल्याचे योगानें, ब्राह्मण त्यांस या ग्रंथावलोकनाचे योगानें आपला बचाव करिता यावा असा हेतू आहे, म्हणून हया ग्रंथास ‘शेतकऱ्याचा असूड’ असे नाव दिले आहे.

वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असतां, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करूं लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागाइती करुं लागले, ते माळी व जे हीं दोन्हीही करून मेंढरें, बकरी वगैरेचे कळप बाळगूं लागले, ते धनगर असे निरनिराळया कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आतां या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसात फक्त बेटी१ - व्यवहार मात्र होत नाही. बाकी अन्नव्यवहारादि सर्व कांही होते. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत. आतां पुढे या तिन्ही जातीतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरुपायानें सोडून उदार्निर्वाहास्तव नाना तऱ्हेचे धंदे करू लागले.

ज्यांजवळ थोडेबहुत अवसान आहे ते आपली शेती सांभाळून राहतात व बहुतेक अक्षरशून्य देवभोळे, उघडे नागडे व भुकेकंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल थारा उरला नाहीं, ते देश सोडून जिकडे जिकडे चरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करूं लागले, कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा. तसेंच कोणी कंत्राटें व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटीं पेनशनें घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीनें पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवितात, परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुलें, ज्यांस विद्येची गोडीच नाही अशीं, त्यांची थोडयाच काळांत बाबूके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नांवानें पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. कित्येकांच्या पूर्वजांनी शिपायगिरीच्या व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, इनामें वगैरे कमाविली व कित्येक तर शिंदे-होळकरांसारखे प्रतिराजेच बनून गेले होते. परंतु हल्ली त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळे आपआपल्या जहागिरी, इनामें गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्ली कर्जबाजारी होत्साते कित्येक तर अन्नासही मोताद झाले आहेत. बहुतेक इनामदार जहागिरदांस आपल्या पूर्वजांनी काय काय पराक्रम केले, कसकशीं संकटे भोगिली यांची कल्पना मनांत न येतां, ते ऐत्या पिठावर रेघा ओढून अशिक्षित असल्यामुळे दुष्ट व लुच्चे लोकांचे संगतीने रात्रंदिवस ऐषआरामांत व व्यसनांत गुंग होऊन, ज्यांच्या जहागिरी गहाण पडल्या नाहीत, अथवा ज्यांस कर्जाने व्याप्त केले नाही असे विरळाच. आता जे संस्थानिक आहेत त्यांस जरी कर्जवाम नाहीं, तरी त्यांचे आसपासचे लोक व ब्राह्मण कारभारी इतके मतलबी, धूर्त, धोरणी असतात की, ते आमच्या राजेरजवाड्यांस विद्येची व सद्गुणांची अभिरुचि लागूं देत नाहीत.

यामुळे आपल्या खऱ्या वैभवाचे स्वरूप न ओळखून, आपल्या पूर्वजांनी केवळ आमचया चैनीकरिताच राज्य संपादन केले असे मानून, धर्माचे योगाने अंध जहालेले, राज्यकारभार स्वतंत्र पाहण्याचे आंगी सामर्थ्य नसल्यामुळे केवळ दैवावर भार टाकून ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंझळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात. अशा राजेरजवाड्यांच्या हातून आपल्या शूद्र जातबांधवांचे कल्याण होण्याचा संभव विशेष, परंतु त्यांच्या मनात जो विचार कधीही आला नाही व जोपर्यंत ‘ब्राह्मणो मम दैवतं ’ हे डोक्यांतून निघाले नाही, तोपर्यंत कितीही कपाळकूट केली तरी ती व्यर्थच जाणार व इतकेही करून तसें करण्यास कोणी प्रवृत्त झाल्यास बाळपणापासून मनावर जाहलेल्या दृढ संस्कारामुळे या मतलबी धर्माचे विरुद्ध चार गोष्टी ऐकून त्यांचा विचार करणे त्यांस कोठून रुचणार? व जवळचे कारभारी अगोदर अशा निस्पृह व खऱ्या जात्याभिमान्याची डाळच शिजूं देणार नाहीत, तशांतून धैर्य धरून एकाद्यानें मला तशी सवड दिल्यास मोठ्या आनंदानें मी यथामति आपले विचार त्यांचेपुढे सादर करीन.

असों, जगांतील एकंदर सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पहातां, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळया शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशूपलीकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल.

हा ग्रंथ अनेक इंग्लिश, संस्कृत व प्राकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून रचिला आहे, हे सांगणयास नको, असे सहाय्य घडल्यावांचून याची रचना करतां आली नसती हे उघडच आहे.

या ग्रंथात जे कांही मी माझ्या अल्प समजुतीने शोध लिहिले आहेत, त्यांत आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानांत जीं जीं व्यंगे दिसून येतील, त्यांविषयीं मला क्षमा करून, गुणलेशांचा स्वीकार करावा, अशी त्यांस माझी विनंती आहे. आणि जरकरिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ जर त्यांस कांही (ग्रंथाधार वगैरे) सुचविणे असेल, तर त्याविषयी त्यांनी वर्तमानपत्राद्वारे आम्हास कळवावे. म्हणजे कृतज्ञतापूर्वक आभार मानून, दुसऱ्या आवृत्तीचे वेळीं त्यांचा योग्य विचार करूं.

श्रीमंत सरकार गायकवाड सेनाखासखेल समशर बहादूर सयाजीराव महाराज यांनी मी बडोद्यास गेलो होतो त्या वेळीं आपल्या सर्व राजकीय कामांतील अमोल्य वेळांत काटकसर करून अप्रतिम उल्हासाने व सप्रेम भावानें मजकडून हा ग्रंथ वाचवून साग्न लक्षपूर्वक ऐकिला व श्रीमन्महाराजांनी आपल्या औदार्याप्रमाणें मला द्रव्यद्वारे मदत करून माझा यथासांग अत्युत्तम आदरसत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा फार फार ऋणी आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतूर, हाडपसर, वंगणी, माळयाचे कुरुल वगैरे येथील शूद्र गृहस्थांनी कित्येक वेळां हा ग्रंथ माझ्या तोंडून ऐकला व या ग्रंथांत लिहिलेला मजकूर खराे अशाविषयीं त्यांनी आपल्या सह्या मजकडे पाठविल्या आहेत.
_____________________

मंगळवार, १५ मार्च, २०१६

ब्राह्मणांचे कसब ६

ब्राह्मणांचे कसब - क्रांतीबा फुले

              चाल सहावी

ब्राह्यण शूद्राच्या घरीं पोथी वाचायाचे निमित्तानें शिरुन त्याच्या संसार खटल्यांत हात घालून त्यास कसा बुडवितो याविषयीं.
पवाडा
बामनी कावा ॥ समजुनी घ्यावा ॥
आहेत आकलेचे खबरदार ॥
शहाणे ठक आरपार ॥
ऋषिमंडळ ॥ धर्मांचे बळ ॥ वेद सबळ ॥
कडक बिजलीं श्रापाचें घर ॥
देवा१ लाथ छातीवर ॥
शिपायी क्रूर ॥ लेखणिस धार ॥
दास बा केले महावीर ॥
ब्रह्यम्या मुखु शिरावर ॥
रणीं रणशूर ॥ घुसे बेशीर ॥
तिराचा मार अनीवार ॥
परशरामाचें लष्कर ॥
विद्याहीन ॥ शुद्र पाहून ॥
हळूच कसा गांठितां त्याला
लागतो पोथ्या वाचायाला ॥
बोध करितो ॥ महत्व शिकवितो ॥
चुकेना नित्य नेमाला ॥
गरीबी दावी भोळ्याला ॥
अट्टल धूर्त ॥ पाहून मुहूर्त
समाप्ति दिवस नेमिला ॥
उपटी शालदुशाल्याला ॥
गोडी लावुन । होई कारकुन ॥
आटपी सर्व कारभार ॥
शहाणा ठक आरपार ॥१॥
उघडी दप्तर ॥ पाही सत्वर ॥
रोखे निवडी प्रतवार ॥
तगादे धाडी घरोघर ॥
पैसा उगवी ॥ नोक दाखवी ॥
हुशारी छाप धन्यावर ॥
अर्ज्या दांड कुळावर ॥
नि-या सोडिती ॥ फिरे कोडती१ ॥
माठला अर्जी वाचणार ॥
ठराव पाती बरोबर ॥
कुळा घरीं जाई ॥ सूचना देई ॥
अर्जी केली तुजवर ॥
सांगतो फेड उपकार ॥
माझी समजुत ॥ काढ एकांत ॥
घेवितो तुमची तकरार ॥
करवितो हप्ते मुकरर ॥
करुन फितुर ॥ मुठ केली गार ॥
धन्याची समजूत वरवर ॥
उभय्मता देई गाजर ॥
फिरुन भागला ॥ खरा श्रमला
झॊंप आली आंगी सुरसुर ॥
आंगमोडे देई वारंवार ॥
कामाचा नीर ॥ पोशिला धूर ॥
घराला जाई सूत्रधार ॥
शहाणा ठक आरपार ॥२॥
पाडवा गुढी ॥ ढाल फडफडी ॥
रामजन्माचा पसार ॥
काढी हनुमंत पाठीवर ॥
आषाढमासी ॥ एकादशी ॥
बाकी चार सोमवार ॥
पूजवितो बैल बेंदूर ॥
नागपंचमी ॥ कृष्ण अष्टमी ॥
ब्राह्यणभोजनाचा भार ॥
चंगील तूप पोळीबर ॥
पिंड मांडितो ॥ पाया पडवितो ॥
भादयी भट्टि व्यापार ॥
माजला तट्टू गुलजार ॥
विजय दशमीस ॥ पुजवी घोडयांस ॥
फराळ धनतेरस वर ॥
लक्षुमी-पूजन वहीवर ॥
तुळशी लग्नांत ॥ मकरसंक्रांत ॥
वाचितो वर्षफळ सार ॥
मजुरी घेतो हातावर ॥
पैसा उडाला ॥ शुद्र बुडाला ॥
उरला होळी संवस्कार ॥
मारवी बोंब आखेर ॥
मनीं कल्पिलें ॥ ग्रहण योजिलें ॥
दानधर्माचा भडिमार ॥
शहाणा ठक आरपार ॥३॥
हिशेबी घोळ ॥ सर्व गोंधळ ॥
वाढवी कर्ज डोईवर ॥
आतून होई सावकार ॥
पैशावर जीव ॥ येईना कींव ॥
अर्ज्या करवी धन्यावर ॥
पैसा देई गाहाणावर ॥
वेळ पाहून ॥ संधि साधून ॥
मागणी नेट त्याजवर ॥
तगादा धाडी पाठीवर ॥
दाम दुप्पट ॥ सर्व एकवट ॥
नोंदिती गहाणखतावर ॥
दुमाला पुस्त रजिष्टर ॥
संध्या सोवळें ॥ भस्म टळटळे ॥
कडकली मर्जी धन्यावर ॥
निंदितो खर्चिक हा फार ॥
वर्जिले घर ॥ घरीं व्यापार ॥
चालवी हात गाहणावर ॥
जाळितो पोट व्याजावर ॥
हातावर देई ॥ लेहून घेई ॥
वायदा आट स्टांपावर ॥
ठोकली अर्जी आखेर ॥
धन्यांवर जीव ॥ केली मोठी कींव ॥
बक्षिस बीनभाडे घर ॥
शहाणा ठक आरपार ॥४॥
घालुनी फासा ॥ कोंडिला खासा ॥
मोहरा हिमतीचा फार ॥
कपाळ टेंकी हातावर ॥
तडजोड केली ॥ खाती चढावेली ॥
बेदावा वतनावर ॥
केला शेवट उपकार ॥
उपाय खुंटला ॥ ताप पेटला ॥
झाला तुरंगी वतनदार ॥
स्त्रियेवर पडला संवसार ॥
घर नाहीं दार ॥ वाढला आहार ॥
आखेर पोट दळणावर ॥
भोंवती पोरें जोजार ॥
बाईस जाऊं द्या ॥ पोट भरुं द्या ॥
गाईन दुस-या मधीं सार ॥
टाळी देतो हातावर ॥
राणीबाई ॥ शोधून पाही ॥
पाप हें तुझ्या शिरावर ॥
काय ! तूं जबाब देणार? ॥
समज कांहीं धरीं ॥ उमज अंतरीं ॥
कर विद्येचा प्रसार ॥
सोडू नये कर्तव्य सार ॥
जोतीराव ॥ कसा देई डाव ॥
गवसुन राजनीती वर ॥
शहाणा ठक आरपार ॥५॥

शनिवार, १२ मार्च, २०१६

ब्राह्मणांचे कसब ५

ब्राह्मणांचे कसब - क्रांतीबा फुले

चाल पाचवी

ब्राह्यण जोशी शूद्रानें घर बांधलें म्हणजे घरभरणीच्या वेळी आपण ताजा स्वयंपाक खाऊन उरलेला शिळा पाक धरधण्यास ठेवून कसा जातो याविषयी.

॥ अभंग ॥

पाया उन्हामध्यें बिगारी खांदिती ॥
टोपली वाहाती मलम्याची ॥१॥
गगनीं पाहाडीं गवंडी चढती ॥
विटा त्या मांडिती गा-यामध्यें ॥२॥
माकडाचेपरी सुतार वेंगती ॥
लांकडें जोडिती कळाशीनें ॥३॥
पोटासाठीं सर्व यातना भोगिती ॥
नाहीं पोटीं भीती कामक-या ॥४॥
धामाचे पाझर थेंब टबकती ॥
सर्वदा झटती दया फुटें ॥५॥
श्रम पाहूनिया धनी खुष होती ॥
वचन बा देती जेवणाचें ॥६॥
अशा जेवणास वास्तू नांव देती ॥
खुशामती येती अखेरीस ॥७॥
देऊन मुहूर्त दिवस नेमिती ॥
नादीं लाविताती घरधनी ॥८॥
ब्राह्यणभोजन होम करविती ॥
ढाला उभारीती निशाणांच्या ॥९॥
थाप देऊनिया भोजन सारिती ॥
दक्षिणा ती घेती यथासांग ॥१०॥
संध्याकाळ झाला आशीर्वाद देती ॥
बुडवूनी जाती अज्ञान्याला ॥११॥
धनी कामगार तोंडाकडे पहाती ॥
शिळा पाक खाती सावकाश ॥१२॥
भोळया भाविकाला ठक फसविती ॥
अधोगती जाती जोती म्हणे ॥१३॥

॥अभंग ॥

जळो जळो तुमचें जिणें ॥
उद्योग्या आधीं ताजें खाणें ॥१॥
हे बा कृत्य लाजिरवाणें ॥
समजोत कपटी शहाणे ॥२॥
घ्यावी घ्यावी माझी भाक ॥
जरी कां सांगेन अनेक ॥३॥
स्वकष्टानें पोटें भरा ॥
जोती शिकवी फजितखोरा ॥४॥

शुक्रवार, ११ मार्च, २०१६

विठ्ठल मंदिराचा इतिहास

स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर)

पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.

१)१९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२)कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.

अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.

ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.

क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.

आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.

डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”

श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.

आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.

रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरले.

धैर्य

यहाँ वो ही टिक सकेगा जिसमें धैर्य हो

बुद्ध को एक सभा में भाषण करना था । जब समय हो गया तो बुद्ध आए और बिना कुछ बोले ही वहाँ से चल गए । तकरीबन एक सौ पचास के करीब श्रोता थे । दूसरे दिन तकरीबन सौ लोग थे पर फिर उन्होंने ऐसा ही किया बिना बोले चले गए ।इस बार पचास कम हो गए ।

तीसरा दिन हुआ साठ के करीब लोग थे महामानव बुद्ध आए, इधर – उधर देखा और बिना कुछ कहे वापिस चले गए । चौथा दिन हुआ तो कुछ लोग और कम हो गए तब भी नहीं बोले । जब पांचवां दिन हुआ तो देखा सिर्फ़ चौदह लोग थे । महामानव बुद्ध उस दिन बोले और चौदोहों लोग उनके साथ हो गए ।

किसी ने महामानव बुद्ध को पूछा आपने चार दिन कुछ नहीं बोला । इसका क्या कारण था । तब बुद्ध ने कहा मुझे भीड़ नहीं काम करने वाले चाहिए थे । यहाँ वो ही टिक सकेगा जिसमें धैर्य हो । जिसमें धैर्य था वो रह गए।

केवल भीड़ ज्यादा होने से कोई धर्म नहीं फैलता है । समझने वाले चाहिए, तमाशा देखने वाले रोज इधर – उधर ताक-झाक करते है । समझने वाला धीरज रखता है । कई लोगों को दुनिया का तमाशा अच्छा लगता है । समझने वाला शायद एक हजार में एक ही हो ऐसा ही देखा जाता है ।

ब्राह्मणांचे कसब ४


ब्राह्मणांचे कसब - क्रांतीबा फुले.
             
             चाल चवथी

ब्राह्यण जोशी शूद्राच्या घरांत ऋतुशांतीच्या वेळी दक्षिणा कशी घेऊन जातो याविषयी.

॥ अभंग ॥

ऋतु प्राप्त होता साधिती बा वेळ ॥
साहिना ती कळ उभा दारीं ॥१॥
दाविती उल्हास बोलून मंजूळ
पोटीं तळमळ द्रव्यलोभ ॥२॥
सोडूनीया लाज विचारीती काळ ॥
पाही राशीबळ पंचांगांत ॥३॥
जप अनुष्ठान स्थापिती निवळ ॥
झटती केवळ जसे स्नेही ॥४॥
ब्राह्यणभोजन तूप चळचळ ॥
दक्षिणा तुंबळ आधीं बोली ॥५॥
फुकटचे खाती दाटविती नळ ॥
करी मळमळ पाणी पीतां ॥६॥
धनी जेवतांना उठे पोटशूळ ॥
गुळवणी गूळ पाणी घाला ॥७॥
भॊंदिती अज्ञानी गृह पाठबळ ॥
इहलोकी काळ पोटबाबू ॥८॥
आप्तसोय-यांचा मेळवूनी मेळ ॥
त्यागावें समूळ पाखांडयास ॥९॥
प्रार्थना देवाची भोजन निर्मळ ॥
सदा सर्वकाळ जोती म्हणे ॥१०॥