बाविस धम्म प्रतिज्ञा
1) मी ब्रम्हा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करनार नाही.
2) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करनार नाही.
3) मी गौरी गणपती इत्यादी हिंदु धर्मातील कोनत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करनार नाही.
4) देवाने अवतार घेतला यावर माझा विक्ष्वास नाही.
5) बुध्द हा विष्णूचा अवतार होय हा खोटा व खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो मानते.
6) मी श्राध्दपक्ष करनार नाही पिंडदान करनार नाही.
7) मी बौध्द धम्माच्या विरुध्द विसंगत कोनतेच आचरन करनार नाही.
8) मी कोनतेही क्रियाक्रम ब्राम्हणाचे हातून करवून घेनार नाही.
9) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो मानते.
10) मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन.
11) मी भगवान बुध्दाने सांगितलेल्य अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
12) मी भगवान बुध्दाने सांगितलेल्य दहा पारामिता पळीन.
13) सर्व प्राणीमात्रावर दया करिन, त्यांचे लालन पालन करीन.
14) मी चोरी करणार नाही.
15) मी व्यभिचार करणार नाही.
16) मी खोटे बोलनार नाही.
17) मी दारु पिणार नाही.
18) ज्ञान, शिल आणि करुणा या बुध्दधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालुन मी माझे जीवन चालवीन.
19) मी माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असनार्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदु धर्माचा त्याग करतो करते व बौध्द धम्माचा स्वीकार करतो करते.
20) तोच सध्दम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
21) माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो मानते.
22) मी इतःपर बुध्दाच्या शिकवणीप्रमाणे वागेन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा