( पोस्ट नं 2 )
" बुध्द आणि त्यांचा धम्म "
**********************
प्रथम खंड भाग पहिला
2 पुर्वज
******
1) शाक्यांच्या राजधानीचे नाव " कपिलवस्तु " हे होते
कदाचित हे नाव थोर बुध्दिवादी तत्ववेता कपिलमुनी यांच्या नावावरुन पडलेले असावे .
2) कपिलवस्तुमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता .सिनहु ( सिंहनु) नावाचा त्याला एक मुलगा होता . सिंहनुंचा विवाह कच्चनाशी झाला होता .त्याला शुध्दोदन , धौतोदन, शुक्लोदन , शाक्योदन व आभितोदन असे पाच पुञ होते . या पाच पुञांशिवाय
सिंहहनुला अमिता व प्रतिमा या नावाच्या दोन कन्या होत्या .
3) त्याच्या कुटुंबाचे गोञ आदित्य होते
4) शुध्दोदनाचा विवाह महामायेशी झाला होता . तिच्या पित्याचे नाव "आज्जन " व आईचे नाव " सुलक्षणा " असे होते .अञ्ञन हा कोलिय वंशातील होता .तो देवदह नावाच्या गावी राहत होता .
5) शुध्दोदन हा मोठा योध्दा होता. जेव्हा शुध्दोदनाने शुरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून " महाप्रजापतीची " निवड केली. ती महामायेची वडील (मोठी बहीण ) बहीण होती.
6) शुध्दोदन फार श्रीमंत होता.त्याच्या मालकीची भूमि विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते .असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत.
7) तो ऐषारामात राहात होता. त्याचे अनेक महाल होते .
क्रमश .....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा