( पोस्ट नः 3 )
********************
बुध्द आणि त्यांचा धम्म
********************
प्रथम खंड: भाग पहिला
3) जन्म
-------
1)शुध्दोदनाला सिध्दार्थ गौतम हा पुञ झाला. त्यांच्या जन्माची कथा अशी आहे कि
2) शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महीन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत.
3) हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची प्रथा होती .
4) एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला , सुगंधादि वस्तुंचा उपयोग करुन परतु मद्यपानादि उत्तेजक वस्तु वर्ज्य करुन साजरा करण्याचे ठरविले
5) उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या , मौल्यवान अलकांर घालुन सांजशृंगार केला , आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करुन निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली .
6) त्या राञी शुध्दोदन व माहामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशी झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले .
7) स्वप्नात तिला असे दिसले कि चतुदिक्पावलांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एक विशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजुला उभे राहीले आहेत
8) नंतर चतुदिक्पावलांनी स्ञिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले .
9) त्यांनी तेथे तिला अभंग्यस्नान घालुन तिची वेशभुषा केली . तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावुन असे सजिवले की ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटते .
10) इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला , मी माझा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे . तु माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आंनदाने त्याच क्षणी
महामायेला जाग आली .
क्रमशः वाचा बुध्द आणि त्यांचा धम्म
प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी गेलेच पाहिजे .
* विश्वरत्न *
डाँ बाबासाहेब आंबेडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा